प्रशिक्षण शुल्क
प्रवेश फी : सर्व कोर्स साठी : 500/-
Course Code Title of the Course Fees (Entire Course)
01 प्रारंभिक 4000/-
02 प्रवेशिका प्रथम 4000/-
03 प्रवेशिका पूर्ण 5000/-
04 मध्यमा प्रथम 6000/-
05 मध्यमा पूर्ण 7000/-
06 विशारद प्रथम 8000/-
07 विशारद पूर्ण 9000/-
10 सुगम गायन 5000/- (सहा महिने)
11 सुगम हार्मोनियम 5000/- (सहा महिने)
11 सिंथेसायझर 5000/- (सहा महिने)
-
"प्रारंभिक" ते "विशारद पूर्ण" हा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा अभ्यासक्रम शास्त्रीय गायन, शास्त्रीय हार्मोनियम, तबला, भरत नाट्यम, कथ्थक या विषयांसाठी आहे. ही फी भरताना प्रवेश फी अधिक कोर्सची निम्मी फी विद्यालयात प्रवेश घेतेवेळी भरावयाची आहे. परीक्षेचा फॉर्म भरताना उर्वरित फी जमा करणेची आहे.
-
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची "परीक्षा फी" ही परीक्षेचा फॉर्म भरताना वेगळी भरावयाची आहे. यामध्ये परीक्षा फी समाविष्ट नाही.
-
सुगम संगीतसाठी कोणतीही परीक्षा फी नाही.
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी
भारताच्या स्वातंत्र्यकालीन वर्षांमध्येच म्हणजे सन 1947 मध्ये पंढरपूर एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना झाली. पंढरपूर शहरातील काही तरुण शिक्षकांनी शिक्षण संस्था स्थापन करावी आणि पंढरपुरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने "पंढरपूर एज्युकेशन सोसायटी" संस्थेची स्थापना करण्याची ठरवले. त्याकाळी पंढरपुरामध्ये नगरपालिका संचलित एक आणि खाजगी एक अशा दोनच शाळा होत्या वाढत्या विद्यार्थी संख्येची योग्य सोय लावणे गरजेचे होते त्या दृष्टिकोनातूनच नवीन शाळा स्थापन करण्याचे ठरले पण त्या होतकरू आणि आपल्या विषयांमध्ये तज्ञ असणाऱ्या तरुण शिक्षकांजवळ विद्यार्थीप्रियतेखेरीज आर्थिक भांडवल असे काहीच नव्हते पण त्यांची मने, खंबीर उत्साह, अनंत अडचणीवर मात करण्याची जिद्द आणि आभाळा एवढा दृष्टिकोन होता त्यांनी अनेक नामवंत तसेच सर्व सामान्य लोकांच्या भेटी घेऊन आपली संकल्पना समजावून सांगितली त्यातूनच प्रारंभीचे पाऊल म्हणून अश्विन शुद्ध दशमी शके 1868 विजयादशमी. दिनांक 5 ऑक्टोबर 1946 रोजी या सर्व शिक्षण प्रेमी व नागरिकांची एक सभा घेऊन "पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूर" या संस्थेची स्थापना केली. ते महान संस्थेचे संस्थापक म्हणजे कै. पी. एस. कुलकर्णी, कै. टी. एस. अभ्यंकर, कै. जी. डी. भाळवणकर, कै. बी. आर. रत्नपारखी, कै. एस. सी. पाठक. संस्थेच्या आज कवठेकर प्रशाला, द. ह. कवठेकर प्रशाला, आदर्श बाल व प्राथमिक मंदिर, अध्यापक विद्यालय, पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल अशा ज्ञानदानाच्या शाखा विस्तारल्या असून यामधून सुमारे 5500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
पंचम संगीत विद्यालय
विद्यार्थ्यांमधील सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या आनंदासाठी संस्थेचे सचिव श्री. सुधीर पटवर्धन सर यांचे संकल्पनेतून पंचम संगीत विद्यालयाची स्थापना चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी पाडवा दिनांक २२ मार्च २०२३ रोजी करण्यात आली. ज्या "पाच" ऋषितुल्य व्यक्तींनी पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संस्थेची स्थापना केली, त्यांचे स्मरण म्हणून आणि संगीतातील महत्वाचा स्वर म्हणून "पंचम" असे नामकरण करण्यात आले. शालेय विद्यार्थी, व संगीत विषयाची आवड असणाऱ्यां सर्वांसाठी संगीत विषयाचे परिपूर्ण शिक्षण देण्याचे पंचम संगीत विद्यालयाचे उद्दिष्ट आहे. “सर्वांसाठी संगीत शिक्षण” हे ध्येय घेऊन पंचम संगीत विद्यालय कार्य करत आहे.
पंचम संगीत विद्यालय (संभाव्य) वेळापत्रक*
please visit : Kavathekar Prashala, Pandhapru.
(*बदल विद्यालयाच्या अधीन.)
संपर्क
कवठेकर प्रशाला, नाथ चौक, पंढरपूर.
जि. : सोलापूर. महाराष्ट्र. - ४१३ ३०४ .